पवना धरण परिसरात पावसाने घेतली विश्रांती; पवना धरण 90.38 टक्के भरले

0
646

मावळ, दि.२५ (पीसीबी) – पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर आता कमी होत आहे. परंतु, पवना धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मागील 24 तासांत धरण क्षेत्रात 8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात 1.09 टक्के पाणीसाठा वाढला आहे. आता सध्या पवना धरण 90.38 टक्के भरले आहे.

जुलै अखेर पर्यंत धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने मावळातील शेतकरी आणि पिंपरी-चिंचवडकर यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने चांगला जोर धरल्याने पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे 90.38 टक्के भरले आहे. मात्र पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर आता कमी होत आहे. धरण पूर्ण भरले तरीही शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाआड असाच राहण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा दुसरा स्रोत सुरू होईपर्यंत हीच स्थिती राहिल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.