पद्म पुरस्कार या माजी मुख्यमंत्र्यांनी नाकारला…

0
367

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – दिग्गज राजकारणी, व्यापारी, शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांपासून ते कलाकार आणि सार्वजनिक सेवेतील सामान्य लोकांपर्यंतच्या १२८ जणांची यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

बहुतेकांनी हा पुरस्कार स्वीकारला, पण पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी तो स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गायिका संध्या मुखोपाध्याय यांच्या कुटुंबीयांनी दावा केला की, तिला हा पुरस्कार ऑफर करण्यात आला होता पण त्यांनी तो स्वीकारला नाही. पुरस्काराच्या यादीत तिचे नाव नव्हते.