पत्नीच्या छळ प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

0
234

हिंजवडी, दि. ११ (पीसीबी) – पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फोडून तिला मारहाण करत छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 फेब्रुवारी 2020 ते 10 ऑगस्ट 2021 या कालावधीत मारुंजी येथे घडली.

पुनीतकुमार विवेक शेती (वय ३०, रा. मारुंजी, ता. मुळशी) असे गुन्हा झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुनीतकुमार याने घरगुती कारणावरून फिर्यादी पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्याकडे पैसे मागून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पत्नीच्या कपाळावर दारूची बाटली मारून तसेच पायरीवर आपटले. त्यात पत्नीच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.