पती पासून घटस्फोट घे, मी तुझ्यासोबत लग्न करतो; म्हणत महिलेवर बलात्कार

0
523

दिघी, दि. ११ (पीसीबी) – तुझ्या पतीपासून तू घटस्फोट घे. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे विवाहित महिलेला आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार जुलै 2019 ते 16 मार्च 2022 या कालावधीत चिखली आणि दिघी परिसरात घडला. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

कुणाल शिवाजी निकम (वय 27, रा. घरकुल, चिखली) असे अटक झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना ‘तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू तुझ्या पती पासून घटस्फोट घे. मी तुझ्यासोबत लग्न करतो व तुला सांभाळतो. तुला सुखात ठेवतो’ अशी खोटी आश्वासने दिली. फिर्यादी यांची आरोपीने फसवणूक केली.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला तिच्या घरी तसेच दिघी येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.