पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत दु. १.४५ वा

0
243

देहू,दि.१४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्री क्षेत्र देहूनगरीत आज (दि.14 जून) आगमन होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान संतभुमीत येणार आहेत.

देहू परिसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी सज्ज झाले असून केंद्रीय यंत्रणा, राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेबाबत संपुर्ण काळजी घेण्यात आली आहे. हा संपूर्ण कार्यक्रम दोन तासांचा असणार आहे.

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देहू दौरा –

दुपारी एक वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन होईल
त्यानंतर लगेचच ते विमानतळाहून देहूच्या दिशेने प्रयाण करतील.

एक वाजून 45 मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीर संस्था परिसरात दाखल होतील.

श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि तुकोबांची मुर्ती यांचा 20 मिनिटांचा लोकार्पण सोहळा पार पडेल.

त्यानंतर सभामंडपात साधारण 50 मिनिटांची सभा पार पडणार आहे, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकरी आणि भाविकांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, मंदिर परिसरात मोठा मंडप उभारण्यात आला असून येथेच पंतप्रधान मोदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. समारंभाच्या वेळी संत तुकाराम पगडी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले जाणार आहे.