पंतप्रधान कार्यालयातून फोन; रामदास आठवलेंना मंत्रिपदाची शपथ घेण्याचे निमंत्रण

0
498

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले  आज (गुरूवार) केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्यानंतर आठवलेंच्या  मंत्रीपदावर  शिक्कमोर्तब झाला आहे. तर आठवले यांच्या समर्थकांनी  मंत्रिपदाची अधिकृत घोषणा होण्याआधीच जल्लोषाची तयारी केली होती.

रामदास आठवले यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनी करण्यात  आला आहे. आज सायंकाळी ४.३० वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेटण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण रामदास आठवले यांना प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान,  रामदास आठवले यांनी आमच्या पक्षातर्फे मी एकटाच खासदार आहे. जर आमच्या पक्षाला मोदींनी घेतले, तर माझाच नंबर लागेल असा विश्वास व्यक्त केला होता. मोदींच्या कार्यकाळात अनेक कामे झाली आहेत.  या कामांचा  प्रचार मी चांगल्या पद्धतीने देशभरात केला.  भाजपला दलितांची भरघोस मते मिळाल्याचे आठवले यांनी सांगितले होते.