…पंड्याशी नाव जोडल्यामुळे उर्वशी रौटेला नाराज

0
407

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – हार्दिक पंड्याशी नाव जोडले गेल्यामुळे अभिनेत्री उर्वशी रौटेला प्रचंड नाराज झाली आहे. पंड्या आणि उर्वशी रौटेला रिलेशनशीपमध्या असल्याच्या कोणत्याही अफवा पसरवू नये असा सल्लाच उर्वशीने माध्यमांना दिला आहे.

काही दिवसांपासूनच उर्वशी रौटेला आणि हार्दिक पंड्या रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये जोर धरत आहेत. तसेच विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचे दोन पासेस मिळवण्यासाठी उर्वशीने तिचा प्रियकर हार्दिक पांड्याची मदत मागितली होती अशा आशयाचे व्हिडिओही युट्यूब, इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. अशा बातम्यांना उर्वशी आता कंटाळली आहे. अशा आशयाचे व्हिडिओ अपलोड करू नयेत अशी विनंती उर्वशीने केली आहे.’ युट्यूबवरील वाहिन्यांना मी विनंती करते की कृपा करून माझ्याबद्दल निराधार माहिती देणारे व्हिडिओ अपलोड करू नका. मलाही एक कुटुंब आहे. मला घरी उत्तरही द्यावी लागतात.’ अशी पोस्टच उर्वशी रौटेलाने इन्स्टाग्रामवर केली आहे. हार्दिक पंड्यासोबत अफेअरच्या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचा दावा उर्वशीने केला आहे.

तसेच तिच्या जुन्या मॅनेजरने या अफवा पसरवल्याचेही उर्वशीचे म्हणणे आहे. त्या मॅनेजरला उर्वशीने कामावरून काढून टाकले होते.