पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या

0
739

चंदीगड दि. २९ (पीसीबी) – प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर मनसा येथील जवाहरके गावात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचे दोन साथीदार जखमी झाले आहेत.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आप सरकारने शनिवारीच सिद्धू मुसेवाला याची सुरक्षा कमी केली होती. मुसेवाला याच्याकडे आधी ८ ते १० सुरक्षारक्षक होते. कालपासून सुरक्षा कमी केल्यानंतर मुसेवाला याच्या संरक्षणासाठी केवळ दोनच गनमॅन ठेवले होते. प्राथमिक माहितीनुसार मुसेवाला त्याच्या साथीदारांसह गाडीतून जात होता. त्यावेळी काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.