नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे 124 km राईड

0
232

पुणे, दि. २३ (पीसीबी) – देशात विविध ठिकाणी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी इंडो ॲथलीटीक सायकलिंग ग्रुप मार्फत आजच्या दिवशी पुणे येथील नेताजी सुभाष चंद्र बोस नगर या ठिकाणी जाऊन प्रतिमेस हारपुष्प वाहुन जयंती केली.

सकाळी पाच वाजता भक्ती-शक्ती येथून निघून न्हावी सांडस येथील शिवसमर्थ महाराजा अग्रसेन गोशाळेला भेट देऊन पुन्हा नेताजी सुभाष चंद्र बोस नगर येरवडा पुणे येथे विभागातून शहरातल्या सदस्यांनी सहभाग घेतला.इंडो अथलेटिक्स सोसायटी तर्फे तब्बल 35 जणांनी या फेरीमध्ये भाग घेतला .

राईड साठी कृष्णकांत बंसल, रमेश माने, कुणाल आहेर, सुनील हत्त, माधव काळे, चिन्मय पाटील, रमेश कुमार, सतीश वारियर यांनी नियोजनात मदत केली, असे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले. दरवर्षीच्या तुलनेत आज सायकलवर लांब लांबून सायकलिस्ट दर्शनास येत या ठिकाणी भेटून आनंद झाला, असे सायकलस्वारांनी सांगितले.