निवडणुकीच्या प्रचारात जवानांच्या फोटोंचा वापर नको; निवडणूक आयोगाच्या सक्त सुचना

0
746

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सैन्यांच्या फोटोंचा  वापर करू नका, अशा सक्त सुचना केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिल्या आहेत.  निवडणूक आयोगाची नुकतीच एक बैठक  झाली. यावेळी या सुचना देण्यात आल्या असून   याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर  करण्यात आले आहे.

याबाबत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना पत्र पाठवले आहे. निवडणुकीमध्ये लष्करी अधिकारी किंवा जवानांचा फोटो वापरू नका .  राष्ट्रीय अथवा कोणत्याही स्थानिक पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारातील साहित्यात न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे.

दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेले सर्जिकल स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, पुलवामा हल्ला अशा घटनांचा वापर स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टरवर केल्याचे समोर आले आहेत. यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.