निगडीत विविध गुन्ह्यातील १० गुन्हेगारांना अटक करून २१ गुन्हे उघड 

0
962

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – वेगवेगळ्या गुन्ह्यातील १० आरोपींना अटक करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील २० आणि पुणे पोलिस आयुक्तालयातील १ असे एकूण २१ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली आहे. गुन्हेगारांकडून सुमारे ६ लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

रवी नरसप्पा रेड्डी (वय २२, रा. सुदर्शनगर, आकुर्डी), शक्तीकेश शिवकुमार प्रजापती (वय १८, रा. चिंचवड), अरबाज रियाज पठाण (वय १९), विशाल कमलाकर डोंगरे (वय १९, दोघे रा. ओटास्किम, निगडी), यांना अटक करून एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचप्रमाणे प्रमे प्रकरणातून खून करून त्याचा पुरावा नष्ट करणारे धन पठाणी कामी (वय ४२, रा. चिखली), खेमराज राणा कामी (वय २५, रा. शिंदेवस्ती, रावेत) तसेच त्यांची साथीदार पूजा रामसिंग ढकलवार (वय २५, रा. चिखली) याना तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत आरोपी साजन मन्नू मेहरा (वय २५, रा. देहूरोड) याला पोलिसांनी दोन पिस्तून आणि सहा जिवंत काडतूसांसह अटक केली आहे. तसेच एक स्टील प्लेटींग मॅग्झिनसह अटक केले. साजन याच्यावर देहूरोड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे पाच गुन्हे दाखल आहेत. या आरोपींसह पोलिसांनी लॅपटॉप चोरी प्रकरणातील आंद त्र्यंबक इंदुकाने (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यालाही अटक केली आहे.

दरम्यान, तपासातमध्ये निगडी पोलिसांनी ठाण्यातील १२, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील २, आणि पिंपरी पोलिस ठाण्यातील ३, वाकड, खडक, सांगवी आणि दिघी पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण २१ गुन्हे उघडकीस आले आहेत. निगडी पोलिस तपास करत आहेत.