निगडीत दोघा सख्या बहिणींचा घरात घुसून विनयभंग

0
1184

निगडी, दि. २७ (पीसीबी) – घरात घुसून दोघा सख्या बहिणींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.२५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निगड ओटास्कीम येथे घडली.

याप्रकरणी पीडित २१ वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर जाधव (रा. माता रमाई बिल्डींग, ओटास्कीम) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २१ वर्षीय तरुणी ही मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिच्या बहिणीसोबत घरी होती. यावेळी आरोपी सागर हा त्यांच्या घरात घुसला आणि त्याने एका तरुणीच्या गळ्यात हात घातला तर दुसऱ्या तरुणीचा हात पकडून गच्चीवर चल, असे बोलून विनयभंग केला. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास बघुन घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सागर विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.