निगडीतील सहा महिन्याच्या चिमुरड्याला हाडांशी संबंधित दुर्धर आजार; उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

0
2384

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – हाडाशी संबंधित ऑस्टिओपेट्रोसिस हा दुर्धर आजार झालेल्या सहा महिन्याच्या चिमुरड्यावर गुंतागुतीचे उपचार करण्याची आवश्यकता आहे. बोनमॅरो ट्रान्सप्लांट हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. उपचारासाठी ३५ लाखांचा खर्च येणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन चिमुरड्याच्या पालकांनी केले आहे.

निगडी, प्राधिकरणात राहरणारे सुरज घाटोळ यांच्या दीप या सहा महिन्याच्या मुलाला ऑस्टिओपेट्रोसिस या हाडाशी संबंधित दुर्धर आजाराने ग्रासले आहे. या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार असून त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. त्यासाठी ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

जन्मानंतर दीप याला ३ आठवडे उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तीन महिन्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये डॉक्टरांनी दीप याला हाडाशी संबंधित ऑस्टिओपेट्रोसिस हा दुर्धर आजार असल्याचे सांगितले. बोनमॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार असून त्यासाठी ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. घाटोळे कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे.

घाटोळे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. घाटोळे कुटुंबियांकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी भरघोस मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपण मदत देऊ शकता तसेच आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह whats app आणि Facebook वर share करून आवश्यक रक्कम वाढविण्यात आम्हाला मदत करण्यासाठी घाटोळे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.

देणगीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.impactguru.com/fundraiser/help-baby-of-shraddha-ghatol