नाव आणि मेलचा गैरवापर करून पावणे पाच लाख परस्पर ट्रांसफर

0
259

निगडी, दि. ६ (पीसीबी) – नाव आणि मेलचा गैरवापर करून एका खातेधारकाने त्याच्या खात्यावर ४ लाख 80 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती अधिकार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश केशवदास सचदेव (वय 49, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयसीआयसीआय बँकेच्या 187905500334 या खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खातेधारकाने अजय मोतीलाल रैना यांच्या नावाचा आणि मेलचा गैरवापर करून आरटीजीएस द्वारे चार लाख 80 हजार रुपये 187905500334 खाते क्रमांकावर पाठवण्यास फिर्यादी यांना सांगितले. हा प्रकार 10 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या कालावधीत चिंचवड एमआयडीसी येथे घडला आहे. याबाबत 5 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.