‘नाना पटोले महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती; हि गोष्ट नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये’

0
311

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे’ असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ‘नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये’, असा सल्ला नाना पटोलेंना दिला.

राऊत पुढे असंही म्हणाले कि, ‘मला असं वाटत नाही. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन विधान केलं असं वाटत नाही. राजकारणात पाळत ठेवणं याचे खूप वेगवेळे संदर्भ असतात. मलाही सरकारची सुरक्षा आहे. त्यामुळे सरकारकडून सुरक्षेची माहिती घेतली जाते. आपण कुठे जातो? काय करतो? कुठे गेल्यामुळे धोका आहे? एखाद्या अतिविशिष्ट व्यक्तिला सुरक्षा दिल्यानंतर त्याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. नाना पटोले हे अति महत्त्वाची व्यक्ती आहेत. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाचं फार गांभीर्याने घेऊ नये. आम्ही सुद्धा घेत नाही. अशी विधानं होत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्यांनी त्या पद्धतीने काम करावं’, असा सल्ला राऊत यांनी दिला.

पुढे भाजप नेते नारायण राणें बद्दल बोलताना राऊत म्हणाले कि, ‘नारायण राणे यांची राजकारणातील कारकिर्द मोठी आहे. तुम्ही त्या अर्थाने घेऊ नका. त्यांची मोठी कारकिर्द आहे. त्या तुलनेत कमी महत्त्वाचं खातं दिलं का? असा माझा प्रश्न होता. तो विषय संपला आता. त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. नक्कीच त्याचा महाराष्ट्राला देशाला फायदा होईल. त्यांचं काही म्हणणं असू द्या. माझा विषय संपला आहे’, असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिल