नाक घासायला लावल्याने तरुणाची आत्महत्या : तिघांना अटक

0
425

चऱ्होली, दि. १९ (पीसीबी) – नाक घासायला लावल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १७) सायंकाळी साडेसहा वाजता डुडुळगाव येथे घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

किरण रामदास कान्हुरकर (वय ३४), विजय दत्तात्रय तापकीर (वय ३२), अमोल बाळासाहेब तापकीर (वय ३०, रा. वडमुखवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह अभिनव अर्जुन गायकवाड (वय १८, रा. डुडुळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन सोपान तळेकर (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मनोज दिगंबर ढोले (वय २२, रा. डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नातेवाईक महिला प्राजक्ता किरण गायकवाड (वय २२) यांना फिर्यादीचा मामा मयत सचिन तळेकर यांनी महानगरपालिकेच्या कामाच्या संदर्भात एकटेच भेटायचे आहे, असे सांगितले. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्या मामाला हाताने मारहाण करून जमिनीवर नाक घासायला लावले. त्यानंतर फिर्यादी यांचा मामा सचिन तळेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांनाही शिवीगाळ केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.