नवी मुंबईत गणेश नाईक यांनी मोठा धक्का

0
256

नवी मुंबई, दि. २५ (पीसीबी) : ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेविका तनुजा मढवी या प्रभाग क्र 83 च्या भाजपा नगरसेविका होत्या. पण अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांआधीही काही नगरसेवकांनी भाजपची साथ सोडली. त्यामुळे नवी मुंबईत भाजप आणि गणेश नाईकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नवी मुंबईतील याआधी पाच आणि आता आणखी एका नगरसेवकानी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे हा भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का असल्याचं मानलं जात असून त्यामुळे नाईक गोटात खळबळ उडाली आहे. पण नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असली तरी नाईक यांनी मात्र, जे गेले त्यांना शुभेच्छा, असं म्हणत या बंडखोरांना शुभेच्छा दिल्या होत्या.

भाजपमधील बंडखोरीनंतर गेल्या काही दिवसांआधी गणेश नाईक यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन चोख प्रश्नांची उत्तरं दिली होती. जे पक्ष सोडून गेले त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नव्या पक्षात दाखल झालेल्यांनी तिथे सुखाने नांदावे. नांदा सौख्य भरे, असं सांगतानाच मला नगरसेवकांनी सोडून जाणं हे नवीन नाही. ही आजची घटना नाही किंवा पहिल्यांदाच असं घडतंय असं नाही. 1995 पासून ही धरसोड सुरूच आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.