नवलाख उंब्रे येथे गरवारे कंपनी व वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण

0
707

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – राज्यशासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड या उपक्रमाअंतर्गत चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबर लिमिडेड कंपनीच्या वतीने नवलाख उंब्रे एमआयडीसी येथे  वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला.  

गरवारे कंपनी व वनविभाग यांच्यावतीने नवलाख उंब्रेतील एमआयडीसी येथे  वनक्षेत्रपाल ताकवले  वनरक्षक कड, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, कामगार व कर्मचारी यांच्या उपस्थितीत २ हजार बांबूच्या झाडांची लागवड  करण्यात आली.

याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र शिवराईकर, सुधीर राणे, गणेश भोसले, अविनाश चौधरी, निशांत जाधव, अरविंद जाधव, अनिल चव्हाण, संघटनेचे जनरल सेक्रटरी माधव ढमाले, श्रीराम ठाकरे, शेखर गाडे आदी कामगार व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, कंपनीने आतापर्यँत सिंहगड, घोराडेश्वर, दत्तगड दिघी, बाणेर हिल अशा विविध ठिकाणी झाडे लावून झाडांच्या संगोपन आणि संवर्धनाची काळजी घेतली आहे.