नरेंद्र मोदी, अमित शहा यांना निर्दोष ठरवण्यास निवडणूक आयुक्तांचा होता विरोध

0
496

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिता भंगाच्या पाच तक्रारींमध्ये त्यांना निर्दोष ठरवण्यास निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी विरोध केला होता, अशी माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी मोदी यांना आचारसंहिताभंगाच्या सहाव्या तक्रारीबाबत निर्दोष ठरवले होते. पाटण (गुजरात) येथील २१ एप्रिलच्या प्रचारसभेत मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसने केली होती. आपण पाकिस्तानला तंबी दिल्यामुळेच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली होती, असे प्रतिपादन मोदी यांनी या प्रचारसभेत केले होते.