नरेंद्र मोदीं, उद्दव ठाकरे, राज ठाकरे एकाच मंचकावर

0
321

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच 24 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात सुरू असलेलं कोल्ड वॉर, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन वारंवार भाजपकडून शिवसेनेला विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यातच मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे, हा एक नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून मंगेशकर कुटुंबीयांनी 32 वर्षांपूर्वी स्थापन केला आहे. प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार 24 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल, येथे आयोजित करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर यांचा 24 एप्रिल हा स्मृतीदिन असून त्यानिमित्ताने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.