नगरसेवक मोरेश्वर भोंडवे सुध्दा कोरोना बाधित, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे निगेटिव्ह

0
640

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे  आणि मोरेश्नवर भोंडवे या दोन नगरसेवकांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर स्थायी समिती अध्यक्ष संतोष कोकणे यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे.

सतत नागरिकांशी संपर्क आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे करत असल्याने अनेक लोकप्रतिनिधींवर कोरोनाचे संकट ओढावले आहे.  महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक व विरोधी पक्षनेते नाना काटे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सकाळी समजले तर, रावेत परिसराचे दुसरे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना सायंकाळी समजले की त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. आजवर १५ नगरसेवकांनी कोरोनावर मात केली आहे.

रावेत परिसराचे धडाडिचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे म्हणाले, नुकतेच रिपोर्ट आले, त्यात मी पॉझिटिव्ह असल्याचे समजले. सर्व काळजी घेतली, पण लोकांच्या कामासाठी बाहेर फिरणे भाग पडते. त्यातून कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असावा. आपल्याला कुठलिही लक्षणे नाहीत, मी अगदी  ठणठणीत आहे. मधुमेहाचा त्रास असल्याने अधिकची काळजी घेतो आहे. नागरिकांच्या शुभेच्छा असल्याने कोरोनावर मात करून लवकरच पुन्हा लोकांच्या सेवेत हजर होईल. 

विरोधी पक्षनेने नाना काटे म्हणाले, कोरोनाच्या निमित्ताने अडचणीत आलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेले चार महिने आम्ही सतत प्रयत्न करतो आहोत. कोरोना होऊ नये यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्स असे सर्व उपाय करतो, पुरेपूर काळजी घेत आलो. गल्या चार-सहा दिवसांपासून मला घशात खवखवत होते म्हणून तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह सांगितले. आज रिपोर्ट हातात पडताच पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. तब्बेत ठिक आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आजी-माजी नगरसेवकांना कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर झाली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि जावेद शेख यांचा त्यात मृत्यू झाला. बाकी सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे म्हणाले, माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक अफवा पसरवते आहे. घाबरण्यासारखे काही नाही, मी एकदम फिट आहे.