नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत मतदान केंद्राजवळ भू-सुरुंग स्फोट

0
497

गडचिरोली, दि. ११ (पीसीबी) – येथील  कसनसून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी मतदान केंद्राजवळ आज (गुरूवार)  सकाळी साडेअकराच्या वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला.  या स्फोटात कोणतीही  जीवितहानी झालेली  नाही.  या घटनेनंतर मतदान केंद्रावर  कडेकोट बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. 

मतदान सुरू असतानाच वाघेझरी मतदान केंद्राजवळ स्फोट झाला. यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी गट्टा गावात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात दोन जवान जखमी झाले होते.