धोरण स्थिरता, समन्वय, व्यवसाय सुलभता या गोष्टींवर भर दिला – नरेंद्र मोदी

0
277

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तिसऱ्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात सांगितले की ‘केंद्रातील एनडीए सरकारने नुकतीच आठ वर्षे पूर्ण केली आहेत. वर्षानुवर्षे आपण ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म’ हा मंत्र घेऊन पुढे गेलो आहोत. आपण धोरण स्थिरता, समन्वय, व्यवसाय सुलभता या गोष्टींवर भर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे तिसर्‍या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार समिटच्या भूमिपूजन समारंभात उत्तर प्रदेशमध्ये 80,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या 1,406 प्रकल्पांचे लोकार्पण केले, यावेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, “जगात जी जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यातही आपल्यासाठी मोठ्या संधी आल्या आहेत. आज जग ज्या विश्‍वासार्ह भागीदाराची अपेक्षा करत आहे ते पूर्ण करण्याची ताकद फक्त आपल्या लोकशाही भारतामध्ये आहे. जगालाही आज भारताची क्षमता दिसत आहे आणि भारताच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. कोरोनाच्या काळातही भारत थांबला नाही, तर त्याने आपल्या सुधारणांचा वेग वाढवला आहे. याचा परिणाम आज आपण सर्व पाहत आहोत.