धक्कादायक: ९० महिलांचा खून करणारा सीरियल किलर अटकेत; हस्तमैथुन करुन करायचा खून

5148

अमेरिका, दि. २४ (पीसीबी) – हस्तमैथुन करुन तब्बल ९० महिलांचा खून करणाऱ्या एका ७८ वर्षीय वृध्द सीरियल किलरला पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीने १९७० ते १९८० या काळात कॅलिफोर्नियापासून ते फ्लोरिडापर्यंत या सर्व हत्या केल्या आहेत.

सॅम्यूअल (वय ७८) असे या आरोपीचे नाव आहे.

सॅम्यूअलच्या निशाण्यावर सामाजिक, आर्थिकदृष्टीने गरिब महिला होत्या. यामध्ये खासकरुन व्यसन असणाऱ्या तसेच देहविक्रीय करणाऱ्या महिलांचा समावेश होता. आरोपीने सर्वात जास्त हत्या १९७० ते १९८० च्या काळात केल्या आहेत. आरोपी हत्या केल्यानंतर मागे एकही पुरावा सोडत नसे. सॅम्यूअल हत्या करताना पहिल्यांदा महिलेला बेशुद्ध करत असे. नंतर हस्तमैथुन करत गळा दाबून हत्या करत असे. पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या कारागृहात आहे. पोलीस त्याच्याकडून अजून काही माहिती मिळतीये का यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी गेल्या चार दशकांपासून वेगवेगळ्या देशात प्रवेश करत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. आपल्याला दुसऱ्या कारागृहात हलवले जावे अशी मागणी करत सॅम्यूअलने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.