धक्कादायक; ३४ वर्षीय पुरूषावर सामुहिक बलात्कार

0
1138

मुंबई, दि.२६ (पीसीबी) – वाशीतील जागृतेश्वर तलावाजवळ सोमवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका ३४ वर्षीय पुरुषाला पाच जणांनी तेथील कांदळवनात नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पुरुष तुर्भे परिसरात राहणारा असून सोमवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी  वाशीतील जागृतेश्वर तलाव घाट क्र.२ येथे गेला होता. यावेळी तो मोबाइलवर बोलत असताना त्याठिकाणी आलेल्या २५ ते ३० वयोगटातील पाच तरुणांनी त्याला जबरदस्तीने उचलून टाटा कॉलनी व जागृतेश्वर तलाव घाटालगत असलेल्या कांदळवनाच्या झुडुपात नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपी तरुण तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी व कंडोम टाकून त्याचा छळ करून पलायन केले. या प्रकारामुळे गंभीर जखमी झालेल्या पीडित पुरुषावर कोपरखैरणे येथील खासगी रुग्णालयात तातडीने शस्रक्रिया करण्यात आली असून अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, वाशी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून. त्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.