धक्कादायक: थेरगावात बापाने दोघा मुलींवर केले कोयत्याने वार

0
571

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून बाप कोयता घेऊन आईला मारण्यासाठी आला. यावेळी दोघा बहिणींनी मध्यस्ती करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रुर बापाने दोघामुलींवरच कोयत्याने वार करुन पळ काढला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी साडेतीनच्या सुमारास थेरगाव गुरुनानकनगर येथे घडली.

निकीता आणि निता असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या दोघा मुलींची नावे आहेत. याप्रकरणी वडिल विलास नामदेव सुबुगडे (वय ४५, रा. गुरुनानकनगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी विलास हा त्याच्या पत्नीला मारण्यासाठी हातात कोयता घेऊन घरात शिरला. त्याने, पत्नीला “तु माझ्या विरोधात पोलिसात तक्रार करतीस का”, असे बोलून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्या दोन्ही मुली निकीता आणि निता यांनी मध्यस्ती करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पारा चडलेल्या बापाने दोघामुलींवरच कोयत्याने वार केले आणि पसार झाला. याप्रकरणी विलास विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या विलास फरार आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक भोगम तपास करत आहेत.