देश विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे नाव म्हणजे “मन की बात”: शत्रुघ्न काटे.

0
251

पिंपरी दि.३०  (पीसीबी) : आज रविवार दि.३०/०४/२०२३ रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय “मन की बात” या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने बासुरी बँकवेट हॉल , हॉटेल गोविंद गार्डन , पिंपळे सौदागर याठिकाणी प्रसारित करण्यात आला.

३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा प्रसारित झालेला हा पहिला आध्याय आज नाबाद शतक साजरे करत आहे.मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले देशाचे प्रधानमंत्री दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपल्या सर्वांशी संवाद साधत दैनंदिन विविध मुद्द्यांवर नागरिकांशी मनसोक्त संवाद साधतात आणि म्हणूनच या कार्यक्रमामुळे त्यांचा नागरिकांसोबत एक भावनिक बंध निर्माण झाला आहे.

या कार्यक्रमाने देशातील नागरिकांमध्ये एक वेगळे विश्वास प्रस्थापित केले आहे आणि याचे कारण म्हणजे देशाच्या प्रधानमंत्रीचा आपल्या बनागरिकांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन. या शतकीय संवादाचे औचित्य साधून श्री शत्रुघ्न काटे म्हणाले कि , देशाचे प्रधानमंत्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या देशासमोर असलेली आव्हाने , आपल्या विविध क्षेत्रातील उपलब्धी , विज्ञान, कौशल्य विकास, स्वच्छ भारत अभियान, आरोग्य, परीक्षेचा ताण सहन करत असलेली मुले, शेतकऱ्यांशी संबंधित समस्या, बोर्डाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांचे अभिनंदन , आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे फायदे, भ्रूणहत्या, मुलींचा सर्वांगीण विकास, भारतीय सैनिकांचे गुणगान, जन धन योजनेचे यश , इतर अनेक विकास योजना, खेळाडूंचे कौतुक, वेळोवेळी होणारी नैसर्गिक आपत्ती याबद्दल पुढे येऊन माहिती देतात , मार्गदर्शन करतात . त्यामुळे हे आपले देखील कर्तव्य आहे कि त्यांच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग बनून पुढाकार घ्यावा . यावेळी या अश्या ऐतिहासिक मन की बात या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोडच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी या शतकीय संवादामध्ये आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते.