देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन; होर्डिंग, बॅनर लावले तर पक्ष शिस्तभंग होईल

0
299

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. दरम्यान. या निमित्तानं भाजपानं कार्यकर्त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस २२ जुलै रोजीच असतो. त्यांनीदेखील यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते / कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत. असं केल्यास तो पक्षशिस्तीचा भंग मानण्यात येईल.