‘दुचाकी का ढकलली?’ अशी विचारणा केल्याने भावाने केला वार

0
292

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – दुचाकी का ढकलून दिली, असे विचारल्यावरून भावाने भावाला चाकूने भोकासले. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी साडेतीन वाजता माळआळी, चाकण येथे घडली.

महंमद मुस्तफा सय्यद (वय 56, रा. माळआळी, चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लयाकत मुस्तफा सय्यद (वय 50) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पार्क कलेली मोपेड दुचाकी फिर्यादी यांचा लहान भाऊ आरोपीने ढकलून दिली. याबाबत फिर्यादी यांनी त्याला विचारणा केली. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना चाकूने पोटात भोकसून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.