दुकानाचे शटर उचकटून दीड लाखांची रोकड लंपास

0
300

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – आकुर्डी स्टेशन चौकातील एका दुकानाचे शटर उचकटून एका चोरट्याने दुकानातून एक लाख 40 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली आहे.

मेधा उमेश गोखले (वय 47, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोखले यांचे आकुर्डी स्टेशन चौकाजवळ फास्टट्रॅक शॉप नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री गोखले यांनी त्यांचे दुकान कुलूप लाऊन बंद केले. गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास एक अनोळखी चोरटा तोंडाला मास्क, हातामध्ये ग्लोज घालून आला. त्याने दुकानाचे शटर उचकटले आणि दुकानातून दोन हजार, 500, 200, 100 आणि 50 रुपये दराच्या नोटा अशी एकूण एक लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार दुकानच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.