दिवसभरात 87 जणांना कोरोनाची लागण

0
340

पिंपरी, दी. 10 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहरात कोरोनाचा कहर सुरुच असून शहराच्या विविध भागातील तब्बल 87 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली.  तर,  वाकड येथील 85 वर्षीय वृद्ध आणि च-होलीतील 68 वर्षीय महिला अशा दोघांचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 929 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील कस्पटेवस्ती, सद््गुरु कॉलनी वाकड, आनंदनगर, जयरामनगर सांगवी,खंडोबामाळ भोसरी,  च-होली,  रमाबाईनगर, विजयनगर काळेवाडी, अजंठानगर, दिघी, मोरेवस्ती, अशोकनगर चिखली, साईबाबानगर पिंपळेसौदागर, बालाजीनगर भोसरी, नढेनगर येथील तब्बल 78 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 42 पुरुष आणि 36 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, सातत्याने अपडेट होणा-या पालिकेच्या डॅशबोर्डवर दिवसभरात 87 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

तर,  वाकड येथील 85 वर्षीय वृद्ध आणि च-होलीतील 68 वर्षीय महिला अशा दोघांचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

तर, आनंदनगर, भोसरी, दापोडी, नवीसांगवी, इंदिरानगर चिंचवड, भिमनगर, भारतमातानगर, नेहरुनगर येथील येथील उपचाराला दहा दिवस पुर्ण झालेल्या. कोणतेही लक्षणे नसलेल्या 25 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आज बुधवारपर्यंत 929 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 506 बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 16 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 19 अशा 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 407 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत