दिलीपकुमार यांचे भाऊ ‘अस्लम खान’ यांचे कोरोनामुळे निधन

0
242

मुंबई,दि.२१(पीसीबी) : बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ अस्लम खान यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. अस्लम खान यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांच्या एहसान खान आणि अस्लम खान या दोन्ही भावांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि अभिनेते दिलीप कुमार यांना क्वारंटाईन करण्यात आलं होत. दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खानदेखील कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
परंतु, अस्लम खान यांचं निधन झालं आहे. अस्लम खान यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे.