दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अबु सालेमच्या नावाने धमकी देणारा अखेर जेरबंद; रत्नागिरीमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
413

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अबु सालेमच्या नावाने धमकी देणाऱ्या व्यक्तीला रत्नागिरी मधून ‘खंडणी विरोधी पथका’ने अटक केली आहे. रत्नागिरी मधून मिलिंद तुळसकर याला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात चौकशीसाठी मुंबईत आणले असता चौकशी दरम्यान मिलिंद तुळसकरने त्याचा गुन्हा मान्य केला.

मिलिंदने अबू सालेमचे व्हिडिओ युट्युबवर पाहून हा प्लॅन बनवला. myneta.com या साईटवरून त्याने महेश मांजरेकर यांचा नंबर शोधून काढून त्यांना खंडणीसाठी कॉल आणि मेसेज करण्यास सुरुवात केली. अबू सालेमशी मिलिंद तुळसकरचा काहीही संबंध नाही, असं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. लवकरात लवकर जास्त पैसे मिळवण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचं कबुल केलं आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अबु सालेमच्या नावाने धमकी देणाऱ्या व्यक्तीला रत्नागिरी मधून खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. मिलिंद तुळसकर असं धमकी देणाऱ्याचं नाव असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील रहाणारा आहे.
मांजरेकरांनी 26 ऑगस्टला दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवीला आणि या प्रकरणाची चौकशी ‘खंडणी विरोधी पथका’कडे तपासासाठी सोपविण्यात आली. आणि त्यांनी आपलं एक पोलीस पथक तयार करून शोधकार्य सुरु केलं. आरोपी मिलिंद तुळसकर याच्या लोकेशन वरून त्याचा तपस लागला. आरोपी मोबाईल सतत बंद करत असल्याने पोलिसांना त्याचा माग लागत नव्हता. गुप्तहेरांच्याकडून आरोपी रत्नागिरीला असल्याचं कळलं. आणि ‘खंडणी विरोधी पथका’ने रत्नागिरीला जाऊन मिलिंदला अटक केली. लवकरात लवकर जास्त पैसे मिळवण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचं कबुल केलं आहे.