दारूसाठी पैसे मागत तरुणाला लुटले

0
236

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – दारू प्यायला पैसे मागत दोघांनी मिळून एका तरुणाला लुटले. तरुणाला मारहाण करून धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री दीड वाजता पिंपरी येथे घडली.सनमान घोरपडे (वय 32), गौरव घोरपडे (वय 35, दोघे रा. गुरुकृपा चाळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव घोरपडे याला पोलिसांनी अटक केली आहे. अप्रकारणी अनिकेत विजयकुमार रामचंदानी (वय 25, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराजवळ त्यांची गाडी पार्क करून घरी जात होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘तू माझ्याबरोबर चल नाहीतर तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणून फिर्यादी यांना धमकी दिली. ‘मी समन वसंत घोरपडे. माझे नाव कोणालाही विचार. तुझ्याजवळ किती पैसे आहे. मला दारू पिण्यासाठी पैसे दे’ असे म्हणत फिर्यादी यांच्या खिशातून दोन हजार रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. आरोपी गौरव याने फिर्यादी यांना मारहाण करून ‘तू कोणास काही सांगितले तर तुझ्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.