दानवे यांच्या पवार आणि राऊत भेटीमागे दडलं काय ?

0
319

मुंबई, दि.१८ (पीसीबी) | गुरुवारी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर दानवे यांनी दोन्ही भेटींमागचं कारण स्पष्ट केलं आहे.

रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यानुसार, हा भेटींमागे कोणतंही राजकीय कारण नव्हतं. साखर आणि कांदा या मुद्द्यांवर मी चर्चा करण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली होती. तर कोरोनाच्या विषयवार चर्चा करण्यासाठी संजय राऊत यांची भेट घेण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना रावसाहेब दानवेंनी म्हटलं की, “आमची घरं फार जवळ आहेत. त्यामुळे आम्ही आपण चहा घ्यायला या म्हणतंच असतो. त्यामुळे या भेटीमध्ये कोरोना सोडून कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही”.

रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, “शरद पवार राज्यातील ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. कधीही काही अडचण आल्यास आम्ही चर्चा करतो. साखर कारखान्यांची समस्या आल्यानंतर शरद पवारांनी अनेकदा मला बोलावून घेतलं. या महिन्यात मला तीन फोन आले. यावेळी त्यांनी साखरेचा प्रश्न निर्माण झाला असून चर्चा करुयात असं सांगितलं. आणि याच कारणासाठी मी त्यांची भेट घेतली.”