दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटीत रोहित शर्माची शतकी सलामी

0
427

विशाखापट्टणम, दि. २ (पीसीबी) – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने पहिल्यांदा कसोटी सामन्यात सलामीला येऊन  १५४ चेंडूंमध्ये खणखणीत शतक झळकावले.  रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर चहापानापर्यंत भारताच्या २०२  धावा धावफलकावर लागल्या होत्या.

रोहितने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला कसोटीत सामन्यात स्थान  कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.  त्याने १५४ चेंडूत शतक झळकावत आपल्या कसोटीतील पहिल्या स्थानाबाबत संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास  सार्थ ठरवला.   त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात झालेल्या कसोटी सामन्यात नाबाद १०२ धावा केल्या होत्या.

२९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या ५४ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सेनुरनच्या बॉलवर एक धाव घेत त्याने विजयी शतकी सलामी दिली.   त्याच्या कसोटी करिअरचे हे चौथे शतक आहे. तर कसोटीत सलामीला आल्यानंतरचे पहिले शतक आहे.