थर्टीफस्टच्या पार्टीतील अपमानाच्या रागातून एकाने पोटच्या मुलांसह घरातील सहाजणांचा केला खून

1603

थायलंड, दि. १ (पीसीबी) – सासरी ठेवलेल्या थर्टीफस्टच्या पार्टीत अपमान झाल्याने भडकलेल्या जावयाने आपल्या मुलांसह कुटुंबातील तब्बल ६ जणांचा गोळ्या घालून खून केला. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. ही धक्कादायक घटना ३१ डिसेंबरच्या संध्येला थायलंड येथे घडली.

सुशीप सोर्संग असे या व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुशीपच्या पत्नीच्या माहेरी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सोमवारी ३१ डिसेंबरच्या संध्येला पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सुशीप या पार्टीत सहभागी होण्यासाठी तिथे गेला होता. यावेळी तो नशेत होता. त्याने जावाई असूनही सासरकडच्या लोकांनी अपले स्वागत केले नाही, या रागातून कुटूंबातील ६ जणांची गोळ्या झाडून हत्या केली नंतर स्वत:वरही गोळी झाडली. मृतांमध्ये सुशीपच्या ९ वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.