…आणि म्हणून ‘त्या’ शेतक-यावर कोयत्याने वार

0
265

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – शेतातून दूध घेऊन घरी जात असलेल्या एका शेतक-यावर एकाने कोयत्याने वार करून जखमी केली. हा प्रकार जुन्या भांडणाच्या कारणावरून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री आठ वाजता सुसगावात डोई ओढ्याजवळ घडली.

संतोष विठ्ठल निंबाळकर (वय 43, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे जखमी शेतक-याचे नाव आहे. त्यांनी याबाबत रविवारी (दि. 22) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुभाण्या (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गाडेकर चाळ, सुसगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजता फिर्यादी निंबाळकर त्यांच्या शेतातून दूध घेऊन दुचाकीवरून घरी जात होते. ते डोई ओढ्याजवळ आले असता आरोपी सुभाण्या याने त्याच्यावर पाठीमागून कोयत्याने वार केले. यामध्ये निंबाळकर गंभीर जखमी झाले. सुभाण्या आणि निंबाळकर यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याच्या रागातून सुभाण्या याने हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.