‘त्या’ वृद्ध महिलेला पोलिसांनी लगोलग घेतलं ताब्यात कारण….

0
432

तळेगाव दाभाडे, दि. ३१ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील आंबी येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून एका वृद्ध महिलेकडून सहा किलोपेक्षा अधिक गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ३०) दुपारी करण्यात आली.

लीलाबाई दत्तू कु-हाडे (वय ६०, रा. आंबी, ता. मावळ) असे कारवाई केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी येथे एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी लीलाबाई हिच्यावर कारवाई केली. तिच्याकडून एक लाख ५५ हजार ७०० रुपयांचा सहा किलो १९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तिच्या विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.