त्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्या प्रकरणी एकास अटक

0
367

सांगवी, दि. २९ (पीसीबी) – कत्तलीसाठी टेम्पोतून जनावरांची वाहतूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजता जगताप डेअरी ते सांगवी फाटा दरम्यान रक्षक चौकात करण्यात आली.

सुग्रीव रोहिदास शिंदे (वय 45, रा. फुरसुंगी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश नढे (वय 28, रा. काळेवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुग्रीव याने त्याच्या टेम्पोत (एम एच 12 / एस एक्स 7145) पाच जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता रक्षक चौकात कारवाई करून पोलिसांनी सुग्रीव याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पाच जनावरे आणि एक टेम्पो असा एकूण एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.