तुरुंगात असलेल्या आसाराम बापूची तब्येत खालावली; ‘या’ रुग्णालयात केले दाखल

0
262

जोधपूर,दि.१७(पीसीबी) – बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंची तब्येत खालावली आहे. आसाराम यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्या आश्रमातील अल्पवयीन महिला भक्ताचे लैगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आसाराम बापू जोधपूर तुरुंगात कैद होते.

आज त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच छातीतही दुखत होते. त्यांना रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आसाराम यांची रक्त तपासणी करणात आली आणि एक्सरे काढण्यात आला. नंतर डॉक्टरांनी आसाराम बापूंना क्रिटीकल केयर युनिटमध्ये दाखल केले. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोलिसांनी आसारम बापूला एमडीएम रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान आसारम बापूची तब्येत खालवल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि भक्तगणांनी रुग्णालयाच्या बाहेर एकच गर्दी केली. यावेळी थोडा तणाव निर्माण झाला पण पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.