तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी त्यापुढे गुडघे टेकणार नाही – संजय राऊत

0
266

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – सक्तवसुली संचलनालयाने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. यानंतर आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या आलिबाग आणि दादरमधील मालमत्तांवर छापेमारी सुरू झाली आहे. सध्या संजय राऊत दिल्लीत आहेत. आज ते गडकरी आणि शरद पवारांसोबत डिनरला जाणार आहेत.

त्याआधीच राऊत यांच्यावर छापा पडल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राऊत यांनी मोदी सरकारवर संताप व्यक्त करत आरोपांचं खंडन केलं आहे. त्यांना वाटत असेल शिवसेना फसली आहे. पण सूडाच्या राजकारणापुढे आम्ही गुढगे टेकणार नाही, असं राऊत म्हणाले.

तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी त्यापुढे गुडघे टेकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. डोक्यावर बंदूक लावाल ना माझ्या, मी तयार आहे, असं उलट आव्हान त्यांनी केंद्रीय यंत्रणांना दिली आहे. माझा हिरेन पांड्या होण्याची भिती आहे. कधीही हल्ला होऊ शकतो, असंही वक्तव्य राऊत यांनी केलंय.

ज्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं आहे. या पद्धतीने राज्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी राज्यसभेत व्यकय्या नायडूंना पत्र लिहिलं आहे. केंद्रातील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राज्यांवर खार खाऊन आहेत. आमच्या कष्टाच्या पैशातून आम्ही संपत्ती घेतली आहे. त्यामुळे अवैध संपत्ती काढून दाखवा, माझी सगळी मालमत्ता भाजपच्या नावावर करीन, असं राऊत यांनी म्हटलंय.

जे नाचे आता नाचत आहेत. हा राजकीय दबाव आहे. भाजपला मिळणाऱ्या देणगीदारांची चौकशी व्हायला हवी. हा एक सूड आहे. मराठी लोकांना यातून तुमचा खरा चेहरा कळेल, असं राऊत म्हणाले.