तुमचाही कार्यक्रम होणार आहे, थोडा वेळ थांबा; मंत्री राम शिंदेंचा अजित पवारांना इशारा

0
743

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) –  तुमचाही कार्यक्रम होणार आहे, थोडा वेळ थांबा,’ असा इशारा नगरचे पालिकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय हवा गरम झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अजितदादा यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. तो आता शांत झाल्यानंतर  आता पुन्हा मंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्यात वाक्ययुध्द रंगण्याची शक्यता आहे.