तुमचं भविष्यवाणीचे दुकान बंद करा; रूपाली चाकणकरांचा संजय काकडेंवर निशाणा

0
677

पुणे, दि. २९ (पीसीबी) –  संजय काकडे तुमचं भविष्यवाणीचं दुकान बंद करा. खरं तर तुम्हा लोकांना, इतका मोठा परिवार आहे, एकत्र राहतो आणि एक विचाराने राहतो याचे जास्त दुःख जास्त आहे. पुण्यातील पूरस्थितीत दिसले नाहीत कुठे, तिकडेही पण बघा जरा,  अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपचे खासदार संजय काकडे यांच्यावर निशाणा साधला. 

संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांबाबत बोलताना  एक  विधान केले होते. अजित पवार हे शांत बसणारे नेते नाहीत ते कदाचित स्वतंत्र पक्ष काढू शकतात,  असे ते म्हणाले होते. काकडे यांच्या  या विधानाचा चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे.

अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर ते नॉट रिचेबलही होते. त्यानंतर त्यांच्याबाबत अनेक  तर्क लढवले जात होते. तर संजय काकडे यांनी अजित पवार हे कदाचित दुसरा पक्ष काढू शकतात, असे म्हटले होते.  काकडे यांच्या या  विधानावर चाकणकर यांनी  सडेतोड उत्तर दिले आहे.