तिहार तुरुंगातील कैद्यामुळे राष्ट्रवादीची झोप उडाली – पंतप्रधान मोदी

0
558

गोंदिया, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसची झोप उडवणारा कैदी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केला. त्यामुळे तिहारमधील ‘तो’ कैदी कोण आणि त्याचे राष्ट्रवादीशी काय संबंध, अशी चर्चा सुरू झाली आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींची दुसरी प्रचारसभा गोंदियात  झाली. या सभेत मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली.

मोदी म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना  आजकाल  झोप येत नाही. कारण  त्यांची झोप दिल्लीमधील तिहार तुरूंगामध्ये अडकली आहे. मी याबाबत अधिक बोलणार नाही. पण जो आत गेला आहे, तो काही बोलला, तर काय होईल? याची चिंता राष्ट्रवादीला वाटू लागली  आहे.  सर्व सत्य समोर येईल, तो दिवस लांब नाही, असे सूचक  विधान मोदींनी यावेळी  केले.