तिरूपती चौकातील रस्त्याच्या कामाला सुरूवात; सीमा सावळे,सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा

0
641

भोसरी, दि. २५  (पीसीबी) –  तिरूपती चौकातील  रस्त्याच्या  कामाला  सुरूवात झाली आहे. या कामांबाबत  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी  पाठपुरावा केला होता.

तिरूपती चौकातील  रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या सुचना    स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.  तसेच रस्त्याच्या खडीकरण आणि  डांबरीकरण कामासाठी  लागणाऱ्या  आवश्यक निधीची तरतूद करून घेतली होती. हा निधी मंजूर झाल्यानंतर   रस्त्याच्या कामाला  सुरूवात करण्यात आली आहे.

या कामांसाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनीही   महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू  केला होता.  आता या कामांना सुरूवात झाल्याने  नागरिकांमधून समाधान  व्यक्त  केले जात आहे.