तळेगाव एमआयडीसी परिसरातून अभियंता बेपत्ता

0
216

तळेगाव, दाभाडे, दि. ५ (पीसीबी) – गोलेवाडी येथील एका कंपनीत काम करणारा तरुण बेपत्ता झाला आहे. याबाबत त्याच्या मोठ्या भावाने तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली आहे.
निर्भयकुमार दिग्विजयनाथ शुक्ला (वय 35, रा. वराळे, ता. मावळ) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोपालकृष्ण दिग्विजयनाथ शुक्ला (वय 37) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्भयकुमार हा तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत अभियंता आहे. तो वराळे येथे राहत आहे. 2 ऑक्टोबर सकाळी आठ वाजल्यापासून त्याच्याशी काहीही संपर्क न झाल्याने 4 ऑक्टोबर रोजी त्यांचा भाऊ गोपालकृष्ण यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान गोपालकृष्ण यांनी निर्भयकुमार काम करत असलेया कंपनीत चौकशी केली. मात्र त्यांना कंपनीतून काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. निर्भयकुमार याचा मोबईल फोन त्याच्या खोलीत मिळाला आहे.
बेपत्ता तरुण निर्भयकुमार रंगाने सावळा, केस मध्यम वाढलेले, दाढी बारीक, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, हिंदी भाषा बोलतो. वरील वर्णनाच्या तरुणाबाबत माहिती मिळाल्यास तळेगाव एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.