तळेगावात किलोभर सोन्याचे खोटे कॉईन देऊन एकाला दहा लाखांचा गंडा

0
843

तळेगाव, दि. ८ (पीसीबी) – वर्षभरात दुप्पट पैसे देतो असे सांगून तसेच १ किलो सोन्याचे खोटे कॉईन देऊन एकाला तब्बल दहा लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना तळेगाव जवळील उर्से गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ घडली.

अब्दुल माजिद दार (वय ५६, रा. वकील हारसुन नं. बायपास बटामलु अपोजीट जिल्हा न्यायालय श्रीनगर, दिल्ली) असे फसवणुक झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रजापती नावाच्या व्यक्तीसह त्याची पत्नी आणि मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रजापती याने अब्दुल यांना एका वर्षात दुप्पट पैसे देतो असे सांगून त्यांना दहा लाख रुपये ठेव म्हणून त्यांच्याजवळ ठेवण्यास सांगितले. यानंतर प्रजापतीने अब्दुलचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना तब्बल एक किलो वजनी सोन्याचे खोटे कॉईन देऊन फसवणूक केली. याप्रकरणी प्रजापती त्याची पत्नी आणि मुला विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.