…तर मग तुमचे रक्षण देवच करेल; सर्वोच्च न्यायालयाची कार्ती चिदंबरम यांना ताकीद      

0
750

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – एअरसेल- मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर होण्याचे आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर चौकशीत सहकार्य केले नाही, तर मग तुमचे रक्षण देवच करु शकेल. आम्ही तुमच्याविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेऊ, अशी सक्त ताकीद न्यायालयाने दिली आहे.

कार्ती चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया या टेलिव्हिजन कंपनीत ३०० कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणूकीसाठी सरकारी परवानग्या मिळवून दिल्याचा आरोप आहे. कार्ती यांनी या परवानग्या मिळवून देण्यासाठी वडिलांच्या पदाचा फायदा घेतला असा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात ईडीकडून तपास सुरु आहे.

या प्रकरणाची आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.  ५, ६, ७ आणि १२ मार्च रोजी कार्ती चिदंबरम यांची चौकशी केली जाईल, असे ईडीने न्यायालयात यावेळी सांगितले.   यावर तुम्ही तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करत नाही. मात्र, जर तुम्ही चौकशीत सहकार्य केले नाही, तर मग तुम्हाला फक्त देवच वाचवू शकेल. आम्ही तुमच्याविरोधात कठोर भूमिका घेऊ, असे  न्यायालयाने  सांगितले.