तरच शहरे स्वयंपूर्ण होतील – प्रा. आल्हाट

0
166

– बारामतीमधील विविध प्रकल्पांना पिंपरी चिंचवड शहरातील महिलांची भेट

बारामती, दि.१ (पीसीबी)-पिंपरी, १ फेबुवारी – बारामती येथील टेक्सटाइल पार्क, काटेवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजित सुनेत्रा उद्यान, विद्या प्रतिष्ठान आदी ठिकाणी भेट देऊन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील महिलांनी माहिती घेतली. असे प्रकल्प राज्यात विविध ठिकाणी उभारल्यास शहरे स्वयंपूर्ण होतील असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट म्हणाल्या.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील महिलांनी बारामती येथील विविध प्रकल्पना भेट दिली. यावेळी महिलांनी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्क, काटेवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजित सुनेत्रा उद्यान, विद्या प्रतिष्ठान आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्क व एन्व्हारमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांची देखील भेट घेण्यात आली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यावेळी म्हणाल्या साठ एकर जागेवर उभे राहिलेले बारामतीचे टेक्‍स्टाईल पार्क देशातील सर्वोत्तम टेक्‍स्टाईल पार्कपैकी एक असून महिलांचे ख-या अर्थाने सक्षमीकरण या ठिकाणी झाले आहे. टेक्‍स्टाईल पार्कच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीतील तीन हजारांवर महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला गेला आहे. 2007 मध्ये हा प्रकल्प सुरु झाल्यापासून या भागातील आर्थिक स्तर नक्कीच उंचावला आहे. येथील काटेवाडी ग्रामपंचायतीचे काम आदर्शवत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास त्यांनाही सर्व बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त होऊन प्रगती करता येईल याबद्दल शंका नाही.